लॉक डाऊनमध्ये पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान ! नसत्या गोष्टी लागतायत मागे...

लॉक डाऊनमध्ये पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान ! नसत्या गोष्टी लागतायत मागे...

मुंबई  : लॉकडाऊनमध्ये पॉर्न साईट्‌सवर व्हिडीओ पाहणाऱ्यांना सायबर गुन्हेगारांकडून खंडणी उकळण्यासाठी मागणी करत असल्याचे समोर आले आहे. त्यात गोपनीय माहिती हॅक केल्याचा ई-मेल पाठवून बिटकॉईनमध्ये खंडणीच्या रकमेची मागणी केली जात आहे. गेल्या महिनाभरात सुमारे 50 व्यक्तींनी या प्रकारच्या तक्रारी केल्या असून आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना खंडणीचे ई-मेल येत असून त्यात तुम्ही काही दिवसांपासून पॉर्न संकेतस्थळाला भेट देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कुठले व्हिडीओ पाहिले, कोणासोबत चॅटिंग केली, त्या वेळचे तुमचे आक्षेपार्ह छायाचित्रही आपल्याकडे असल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. संबंधित माहिती ई-मेलच्या संपर्क यादीतील ओळखीच्या व्यक्तीपुढे जाहीर न करण्यासाठी बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली होती. याशिवाय तक्रारदाराला घाबरवण्यासाठी त्याने पॉर्न साइट्‌स पाहण्यासाठी वापरलेला ई-मेलचा पासवर्डही नमूद करण्यात आला होता. त्यामुळे तुम्ही पॉर्न पाहत असाल, तर महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे अनेक जण सर्रास पॉर्न पाहतात; मात्र त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करत नाही. त्याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी बदनामीची भीती दाखवून खंडणी मागण्याची नवीन कार्यपद्धती अवलंबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे आरोपी संकेतस्थळ चालवणाऱ्यांपैकीच असण्याची शक्‍यता आहे. संकेतस्थळावरून पॉर्न व्हिडीओ डाऊनलोड करताना अर्धवट व्हिडीओ डाऊनलोड होतो. त्यानंतर पूर्ण व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी माहिती भरण्यास सांगितले जाते. माहिती भरल्यानंतर तक्रारदार आरोपींच्या जाळ्यात अडकतो. माहिती भरताना तक्रारदार जी काही माहिती भरतो, ती संपूर्ण माहिती आरोपींच्या हाती लागते. 
तक्रारदार पुढे येत नसल्याने अडचणी

ऑनलाईन खंडणीची नवीन कार्यपद्धती समाजासाठी धोकादायक ठरत आहे; मात्र बदनामीच्या भीतीने अनेक जण गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवत नाहीत. यामुळे या प्रकारचे गुन्हे उघडकीस येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

are you watching those thing during lockdown beware this news is for you

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com