मुंबईतील सर्व विभागांत रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance

कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह आणि अतिजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक आहेत.

मुंबईतील सर्व विभागांत रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह आणि अतिजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्व 24 विभागांत कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

हे ही वाचा : तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून पीपीई परिधान केलेल्या दोन कामगारांसह रुग्णवाहिकांमधून अंत्यसंस्कारासाठी पाठवला जातो. परंतु, एखाद्या रुग्णाचा मृत्यू घरातच झाल्यास मृतदेहाला कोणीही हात लावण्यास तयार नसतो. त्यामुळे महापालिकेचे सहायक आयुक्त व स्थानिक नगरसेवकांना रुग्णवाहिका आणि पीपीई किटधारक कामगारांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी अनेकदा 8 ते 12 तासांचा कालावधी लागतो. 
मुंबईतील कोरोनाची बिकट स्थिती पाहता आणि पुढील धोका लक्षात घेऊन प्रत्येक विभागात पीपीई किट असलेल्या प्रशिक्षित कामगारांसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोठी बातमी : डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

मृतदेहांची परवड
गेल्या आठवड्यात दादरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह 12 तास पडून होता. रुग्णवाहिकेतील कामगारांनीही मृतदेहाला हात लावण्यास नकार दिला होता. मृताच्या दोन्ही मुलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्याची विनंती महापालिकेने केली होती. अखेरीस तब्बल 12 तासांनी पीपीई किट देऊन दोन कामगारांमार्फत मृतदेह उचलून रुग्णवाहिकेतून अंतिम संस्कारांसाठी पाठवण्यात आला. भांडुपमध्येही अशाच प्रकारे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाला हात लावण्यास कुणीही तयार होत नव्हते. अखेर समजूत काढून काही तासांच्या नाट्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला.

Arrange ambulances in all sections of Mumbai, BJP corporator demands from the commissioner

loading image
go to top