esakal | वसई-विरार पालिकेकडून पौष्टिक आहाराची व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वसई-विरार पालिकेकडून पौष्टिक आहाराची व्यवस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यानिमित्ताने मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) या महत्त्वाच्या पालिकांनी जय्यत तयारी केली असताना वसई-विरार (Vasai-Virar) पालिकाही यात मागे नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून पालिकेने रुग्णांना पौष्टिक आहाराची कमतरता भासू नये म्हणून आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे.

याकरिता भांडार विभागाने विविध वस्तूंसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. वसई-विरारमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण मार्च, एप्रिल महिन्यात अधिक होते. या वेळी आरोग्य सुविधांचा अभावदेखील निर्माण झाला होता. पौष्टिक आहाराची नियमितता राहावी म्हणून व्यवस्था करण्यात आली होती. सध्या सर्व व्यवहार सुरळीत होत असताना, तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने आरोग्य यंत्रणा लढा देण्यासाठी तयारी करत आहे. पालिकेने ऑक्सिजन प्लांट, उपचार केंद्र सज्ज ठेवले आहेत.

हेही वाचा: आर्यनला धीर देण्यासाठी 'आई' येणार कोर्टात

यातही पाऊल पुढे टाकत उपचार केंद्रांमध्ये रुग्ण वाढले; तर त्यांना पौष्टिक आहाराची उणीव भासू नये म्हणून भांडार विभागाचे उपायुक्त अजित बगाडे यांनी जेवणाचे डिश, कंटेनर, चमचे, पिशव्या आदींची खरेदी करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने निविदा स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर ११ तारखेस कंत्राटदारांच्या समक्ष निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

loading image
go to top