esakal | पंजाबचा किन्नू मुंबईकरांना भावतोय!
sakal

बोलून बातमी शोधा

पंजाबचा किन्नू मुंबईकरांना भावतोय!

अवकाळी पावसामुळे यंदा संत्री हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. नागपुरी संत्रीचे उत्पादन घटल्याने, राजस्थान, पंजाबमधील किन्नू संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किन्नूच्या 45 नगाच्या पेटीला 250 ते 300 रुपये दर मिळत आहे; तर किरकोळ बाजारात एका किलोला दर्जानुसार 60 ते 80 रुपये भाव मिळत आहे. 

पंजाबचा किन्नू मुंबईकरांना भावतोय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे यंदा संत्री हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. नागपुरी संत्रीचे उत्पादन घटल्याने, राजस्थान, पंजाबमधील किन्नू संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संत्र्यांमध्ये जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. जीवनसत्त्व- क चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने लोक आवडीने खातात. किन्नूच्या 45 नगाच्या पेटीला 250 ते 300 रुपये दर मिळत आहे; तर किरकोळ बाजारात एका किलोला दर्जानुसार 60 ते 80 रुपये भाव मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? डबेवाल्यांना तातडीने घरे मिळावीत

यंदा अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नागपुरी संत्र्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सध्या बाजारात राजस्थान, पंजाब या राज्यातून येणाऱ्या किन्नू संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आकारावरून संत्र्याची किंमत ठरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट-गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात या फळाला किन्नू संत्री असे म्हटले जाते. राजस्थानमधून या किन्नू संत्र्यांची आवक सध्या फळबाजारात सुरू झाली आहे. मोकळी संत्री 30 ते 40 रुपये किलो दराने विकली जातात; तर पेटीमधील संत्री ही नगाने विकली जातात. त्यामध्येही आकारमानानुसार दर ठरवले जातात. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बँकेवर ठेवीदारांचा मोर्चा

पुढील काही दिवसात किन्नू संत्र्यांची आवक वाढेल, असे व्यापारी आरिफ शेख यांनी सांगितले. यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्र्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. हे फळ दिसायलाही आकर्षक असल्याने त्यास शहर व परिसरातून संत्र्याला पर्याय म्हणून चांगली मागणी आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात किन्नू संत्र्यांची आवक सुरू होते. किन्नू संत्र्यांचा हंगाम साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते; तसेच ज्यूस विक्रेत्यांकडूनही किन्नू संत्र्याला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
संत्री पेटी किंमत 
45 नग 250/300 

54 नग 280/300 

60 नग 310/260 

72 नग 300/250 

ही बातमी वाचली का? महाड आगाराचे वेळापत्रक कोलमडले


किन्नू संत्र्यांची सर्वाधिक लागवड राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात होते. त्याखालोखाल पंजाबमध्ये किन्नू संत्र्यांची लागवड केली जाते. ही संत्री आणि मोसंबीचा संकर आहे. बाजारात सध्या तिची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नागपुरी संत्रीचे उत्पादन घट झाली आहे. त्यामुळे किन्नू संत्र्याचा हंगाम आणखी दीड-दोन महिने चालणार आहे. 
- भरत देवकर, फळव्यापारी, एपीएमसी.