स्ट्रॉबेरी खवय्यांसाठी खुशखबर! बाजारात आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. या गारठ्यासह देखण्या स्ट्रॉबेरीला चांगलाच बहर येऊ लागला आहे. त्यामुळे वाशी येथील घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, दरही नियंत्रणात आले आहेत. स्ट्रॉबेरीच्या 55 ते 60 हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत.

नवी मुंबई : वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. या गारठ्यासह देखण्या स्ट्रॉबेरीला चांगलाच बहर येऊ लागला आहे. त्यामुळे वाशी येथील घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, दरही नियंत्रणात आले आहेत. स्ट्रॉबेरीच्या 55 ते 60 हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत. त्यामुळे आता महागडी असणारी स्ट्रॉबेरी खवय्यांना हवी तितकी उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? येथे मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही

बाजारात सध्या लालचुटूक अशा देखण्या स्ट्रॉबेरीच्या 55 ते 60 हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत. महाबळेश्वर, वाई, जावळी या भागामधून ही स्ट्रॉबेरी बाजारात येते. सध्या महाबळेश्‍वरचा हंगाम सुरू आहे. यात विंटर डाऊन, नाभीला, कामरोझा, आर वन, एस वन या प्रकारातील स्ट्रॉबेरी बाजारात येत आहे. या स्ट्रॉबेरी चवीला गोड आहेत. घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची एक पेटी 35 रुपयांपासून 40 ते 50 रुपये, प्रथम दर्जाची स्ट्रॉबेरी पेटी 25 ते 30 रुपये आणि दुय्यम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची पेटी 18 ते 20 रुपयांत उपलब्ध आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीला बाजारात मागणी आहे. ही आवक दररोज एक लाख पेट्यांपर्यंत होईल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. तसेच वातावरणातील गारठा असाच राहिला तर मार्च अखेरपर्यंत मुंबईकरांना मुबलक स्ट्रॉबेरीचा पुरवठा होणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा

स्ट्रॉबेरी हे तसे नाजूक फळ असल्याने घाऊक बाजारात त्याची आवक पेट्यांमध्येच होते. दरवर्षी नोव्हेंबरपासून स्ट्रॉबेरीची आवक बाजारात होत असते. मात्र, यावेळी पाऊस आणि त्यामुळे खराब झालेल्या रोपांमुळे अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती पाण्याखाली गेली. यामुळे स्ट्रॉबेरीचा पहिला हंगाम लांबला गेला. पाऊस थांबल्यावर अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड करून, स्ट्रॉबेरी वाढवली. या काळात चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरीला पोषक असे वातावरण निर्माण झाले असून, उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी बाजारात आता येऊ लागली आहे, अशी माहिती स्ट्रॉबेरीचे घाऊक व्यापारी विजय ढोले यांनी दिली आहे. 

अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचा पहिला हंगाम लांबला गेला. पाऊस थांबल्यावर अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड करून, स्ट्रॉबेरी वाढवली. या काळात चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरीला पोषक असे वातावरण निर्माण झाले असून, उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी बाजारात आता येऊ लागली आहे. 
- विजय ढोले, घाऊक व्यापारी (स्ट्रॉबेरी). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of strawberries in the Vashi apmc increased