आर्थर रोड जेलमधील गँगस्टर आणि कैद्यांची माहुल क्वारंटाईन सेंटरमध्ये रवानगी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

कारागृहाचे अधीक्षकही स्वतःहून क्वारंटाईन, दोनशेहून अधिक नमुने चाचणीसाठी पाठवले

मुंबई - आर्थर रोड कारागृहातील 77 कैदी व सात सुरक्षा रक्षकांना कोरनाची लागण झाल्यानंतर आता सर्वांना माहुल येथील खाली इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सत्रांनी दिली. दरम्यान कारागृहाचे अधिक्षकांचा ऑर्डरलीलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे तेही स्वतःहून क्वारंटाईन झाले आहेत.  कोरोनाची लागणी झालेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये कारागृह अधिक्षकांच्या ऑर्डरलीचाही समावेश आहे.  

आर्थर रोड कारागृहातील एक 50 वर्षीय कैदी आणि दोन गार्डला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सुमारे 150 अधिकारी व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

पालिकेत हजेरीचा घोळ सुरूच! आता 75 टक्के उपस्थितीचे आदेश

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर आर्थर रोड कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते. या कारागृहात 800 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात 2700 कैदी आहेत. त्यातील 400 कैद्यांना बाँडवर सोडण्यात आले असून 300 कैद्यांना नवी मुंबई येथील तळोजा रुग्णालयात हलवण्यता आले आहे. कारागृहातील 77 कैदी व 26 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यात कारागृह अधिक्षकांचा ऑर्डरलीचाही समावेश आहे. अधिक्षकांसोबत असलेल्या ऑर्डरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंततर अधिक्षक स्वतःहून क्वारंटाईन झाले आहेत.

नीरव मोदीच्या पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणातील एका आरोपीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

आर्थर रोड तुरुंग असून दोन दिवसांपूर्वी एका कैद्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात उपायारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याला कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला आता वेगळा वॉर्डमध्ये ठेवले होते. हा रुग्ण सापडलेला यार्ड कन्टेंन्मेंट करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्व कैद्यांच्या वैद्यकीय चाचणीला सुरूवात करण्यता आली आहे.

सावधान! सायबर हल्ल्यांमध्ये दुपटीने वाढ; सतर्क राहण्याचे आवाहन

त्यात काही गँगस्टर्सचाही समावेश आहे. त्याला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यात 103 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता  200 हून अधिक व्यक्तींचा कोरोना स्वॅब घेण्यात आले होते. आर्थर रोड कारागृहातील कोरोना बाधीतांसाठी सेट जॉर्ज व जीटी रुग्णालयात स्वतंत्र विलीगीकरण करण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांना माहून येथील रिकामी इमारतींमध्ये विलग करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतीच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

arthur road prisoners are transferred to mahul quarantine center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthur road prisoners are transferred to mahul quarantine center