कोरोनाचा फटका बसलेल्या रंगमंच कामगारांना मिळाला 'या' कलाकाराचा आधार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 मार्च 2020

प्रशांत दामलेंकडून रंगमंच कलाकारांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आदी गर्दीची ठिकाणे सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचा विविध नाट्यगृहांतील रंगमंच कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा रंगमंचावरील कामगारांसाठी अभिनेता-निर्माते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

१०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

"तू म्हणशील तसं' आणि "एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामलेंच्या नाटकांतील रंगमंच कलाकारांना त्यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. या कठीण प्रसंगात त्यांनी रंगमंचावरील 23 कामगारांना ही मदत केली आहे. या वेळी प्रशांत दामले म्हणाले की, या रंगमंच कामगारांसोबत मी जवळपास 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहे. आणि अशा वेळी त्यांना मदत करणे ही माझी जबाबदारी असून हे माझे काम आहे.

कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

या कामगारांना मदत करून प्रशांत दामलेंनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. कोरोनामुळे नाट्य-व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही नाट्यगृहात सध्या खबरदारी म्हणून नाटकाचे प्रयोग बंद ठेवण्यात आले आहेत.

'this' artist helps to theater workers which hit by corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'this' artist helps to theater workers which hit by corona