esakal | NCB चा नवा खुलासा; आयोजकांकडूनच क्रुजवर अमली पदार्थांची व्यवस्था | Aryan khan
sakal

बोलून बातमी शोधा

aryan khan cordelia cruise

NCB चा नवा खुलासा; आयोजकांकडूनच क्रुजवर अमली पदार्थांची व्यवस्था

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : अमली पदार्था (Drugs) प्रकरणी वर केलेल्या कारवाईत कार्डेलिया क्रूजचे (cordelia cruise) मालक ऑस्ट्रेलियन (Australian owner) असल्याचा नवीन खुलासा करण्यात आला असून या आयोजकांनीच (Organizers) क्रुजवर अंमली पदार्थ ठेवल्याचे तपासात पुढे आले आहे. क्रुज ड्रग्स पार्टी (cruise drugs party) प्रकरणात आज एकूण आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. आता अटक आरोपींची (culprit arrested) संख्या 16 झाली आहे.

हेही वाचा: Cruise Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवलं होतं ड्रग्ज, कोण आहे ती?

कार्डेलिया क्रुज ड्रग्स पार्टीच्या तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. आज आणखी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी रात्री मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर कारवाई केली. यावेळी सुरुवातीला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मूनमून धमीचा यांना अटक केली. त्यांच्या तपासात आणखी माहिती उघड झाल्यानंतर आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा ,विक्रांत चोक्कर या पाच जणांना अटक केली.

या आठ आरोपींच्या तपासात काही ड्रग्स पेडलरची नाव उघडकीस आली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पेडलर असणाऱ्या अब्दुल शेख ,श्रेयस नायर यांना अटक केली. त्याचप्रमाणे कार्डेलिया कृझवर प्रवास करणाऱ्या अमीन साहू,अनिस रॉय दर्या यांना आज अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 11 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांच अटक सत्र सुरू होत. एनसीबी अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी कृझवर पार्टीच आयोजन करणाऱ्या नमसक्रे या कंपनीचे अॅडिशनल डायरेक्टर समीर सैगल ,आंदन गोपाळ यांच्या सह कंपनीचे कर्मचारी भास्कर याच्या सह आणखी एका व्यक्तीला अटक केली.या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: पप्पांशी बोलायचं त्यासाठी लागते अपॉइंटमेंट, आर्यनचा एनसीबीकडे खुलासा

परराज्यातून अधिकारी बोलावले

एनसीबीच्या तपासाची व्याप्ती सतत वाढत आहे.आता पर्यंत 16 जणांना अटक केली. आणखी काही जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीचे मुंबईतील अधिकारी कमी पडत आहेत. यामुळे एनसीबीच्या देशातील इतर कार्यलयातील अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरात,मध्य प्रदेश,दिल्ली येथील एनसीबी अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी समन्स बजावण्यात आलेल्या व्यक्तींचा जबाब घेत आहेत. त्याचप्रमाणे धाडी मध्ये भाग घेत आहेत.

कार्डिलिया क्रुज अंमली पदार्थ परतीच्या आयोजक आणि मालक यांनी 50-50 प्रमाणे या पार्टीचे आयोजन केले होते.विशेष म्हणजे ड्रग्ज पिण्यासाठी लागणारे साहित्य एनसीबीला क्रुजवरील अनेक खोल्यांमध्ये सापडले आहे. हे साहित्य आयोजकांकडूनच ठेवण्यात आल्याचं बोललं जातं.

आर्यनला निमंत्रण नव्हते

अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यनला अधिकृतरित्या क्रुजवर येण्याचं निमंत्रणचं नव्हतं,आर्यनला क्रुजवर आणण्यासाठी मध्यस्थीला एक व्यक्ती होता. याची ओळख पटलेली असून एनसीबी त्याचा शोध घेत आहे. सध्या सर्व आरोपी़ंकडे उलट तपासणी सुरू आहे.

loading image
go to top