इंधन दरवाढीचा Uber ला फटका, 15 टक्क्यांची केली भाडेवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UBER

इंधन दरवाढीचा Uber ला फटका, 15 टक्क्यांची केली भाडेवाढ

मुंबई: इंधन दरवाढीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोलच्या दरामध्ये सात रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने याचा मोठा फटका सर्व सामान्यांना बसलाय. यातच आता पेट्रोलचे भाव वाढल्याने उबेरने (Uber) मुंबईत (MUMBAI) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.(as rising of fuel prices, Uber rides cost also raised by 15 percent in mumbai

हेही वाचा: मेट्रो उद्घाटनावरून रंगणार वाद? फडणवीसांना निमंत्रण नाही

गेल्या २२ मार्च पासून पेट्रोल जवळपास ७ रूपयांपेक्षा जास्त वाढलय. आज पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर वाढत्या पेट्रोलच्या किंमती पाहून उबेरकडून मुंबईमध्ये 15 टक्क्यांनी भाडे वाढवण्यात आले. वाढत्या इंधन दराचा परिणाम हा थेट चालकांवर झाला आहे. चालकांचे मार्जीन घटत असून सर्व बॅलेन्स करण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण उबेर कंपनीने दिले.

हेही वाचा: महाविद्यालयांचे नामफलक मराठीत जळकणार

गेल्या वर्षभरात उबेरकडून दोनदा भाडेवाढ करण्यात आली. मुंबईमध्ये लोक उबेर यासारखा खासगी वाहतुकीचा जास्त उपयोग करतात. त्यामुळे भाडेवाढ करण्यासाठी मुंबईला निवडले, मात्र भाडेवाढीमुळे त्यांच्या खिश्याला झळ पडणार, हे निश्चित आहे.

नव्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 117.57 रुपयांवर पोहोचला तर डिझेलचा दर वाढून 101.79 रुपये झालाय.

Web Title: As Rising Of Fuel Prices Uber Rides Cost Also Raised By 15 Percent In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..