esakal | मंदिर उघडताच मनसे आमदार राजू पाटील यांनी केली दुर्गा पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मंदिर उघडताच मनसे आमदार राजू पाटील यांनी केली दुर्गा पूजा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कोरोनाकाळात (Corona) खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे (Temple) घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडली आहेत. तब्बल दिड वर्षानंतर मंदिरात जाऊन देवाचे पायाजवळ दर्शन घेता येऊ लागल्याने भविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डोंबिवलीतील (Dombivali) प्रसिद्ध श्री गणेश मंदिर देखील आज सकाळी उघडले. मंदिर उघडताच मनसेचे आमदार राजू पाटील व मनसैनिकांनी गणेशाचे दर्शन घेत नंतर दुर्गा पूजा केली.

कोरोना काळात बंद झालेली मंदिरे गुरुवारी राज्य शासनाच्या आदेशानंतर उघडण्यात आली. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करून भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात आले. नवरात्रोत्सवचा पहिला दिवस असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे भक्तिमय वातावरण पहायला मिळाले.

डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी 6 च्या सुमारास भाविकांसाठी खुले करण्यात आले. सुरवातीला गणेशाची आरती झाली. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मन सैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. व त्यानंतर दुर्गा पूजा केली.

हेही वाचा: रंगीबेरंगी मॅचिंग मास्‍कला पसंती; नोकरदार महिलांकडून मागणी

यावेळी आमदार पाटील म्हणाले, कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आली, मंदिर त्यांनी उघडली त्याबद्दल सरकारचे आभार. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची भरपाई सरकारने दयावी. त्वरित पंचनामे करावे, पंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: कल्याणच्या 'त्या' प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई; आयुक्तांचे आदेश

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिर भाविकांसाठी खुले

छञपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा दुर्गाडी किल्ला आहे. याच किल्ल्यावर असलेले दुर्गाडी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. नवरात्रीच्या काळात कल्याणच्या दुर्गाडी मातेचे दर्शन घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून भक्त येत असतात. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत मंदिरात मोठा उत्सव भरतो.

कोरोना काळात मंदिर बंद असल्याने भक्तांना दर्शन घेता येत नव्हते. अखेर आज पासून मंदिर खुले झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी मातेच्या मंदिरात देवीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

loading image
go to top