शिवसेना आमदार असलेल्या ट्रायडंटमध्ये शेलार दाखल!

थोड्या वेळातच इथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही पार पडणार आहे.
Ashish-Shelar
Ashish-Shelar

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच महाविकास आघाडीनं मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर आज पुन्हा मविआच्या प्रमुख नेत्यांची साडेसातच्या सुमारास बैठक पार पडणार आहे. सध्या शिवसेनेचे आमदार याच हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलारही काहीवेळापूर्वीच ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. (Ashish Shelar admitted to Trident Hotel where Shiv Sena MLA residents)

Ashish-Shelar
उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये 'गर्जना'; आजच्या सभेकडे राज्याचं लक्ष

महाविकास आघाडीच्या नेत्यांची साडेसात वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. राज्यसभा आणि विषानपरिषदेच्या निवडणुबाबात यामध्ये चर्चा होणार आहे. यामध्ये अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील, मल्लिकार्जुन खर्गे हे नेते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींना आणि योजनांच्या घोषणांना वेग आला आहे. सगळ्याच पक्षांचे नेते सध्या आपली मत शाबूत ठेवण्यासाठी आणि अधिकची मत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Ashish-Shelar
रावसाहेब दानवेंचे पुत्र मविआला मतदान करणार; सत्तार यांचा दावा

शिवसेनेच्या सर्व आमदारांचा सध्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्काम आहे. त्यातच आता आशिष शेलारही ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी माहिती देताना सांगितलं की, हॉटेलमध्ये आमची एक वैयक्तिक भेट होती. या हॉटेलात ते मुक्कामी आहेत. पण कोत्याही राजकीय हेतूनं इथं आलेलो नाही.

Ashish-Shelar
...तर राज्यसभेसाठी एमआयएम तटस्थ राहणार

दरम्यान, सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं भाजपचीही मतांची जुळवाजुळव सुरु आहे. यापार्श्वभूमीवर शेलार यांनी शिवसेना आमदार असलेल्या ड्रायटंड हॉटेलमध्ये दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com