शेलार म्हणाले, पृथ्वीराजबाबा उदयनराजेंसमोरून घाबरून पळाले!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. यामुळे साताऱ्याची जागा हॉटसीट समजली जाते. भाजपने साताऱ्याची लोकसभेसाठी उमेदवारी उदयनराजे भोसले यांना दिली. पण राष्ट्रवादी-काँग्रेसचे अजूनही याबाबत काही ठरत नसल्याचं दिसतंय. यावरूनच भाजपचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे.

Video : सर्व पक्षांकडून ऑफर, पण भाजपचा फोनही नाही; मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर

राष्ट्रवादी-काँग्रेसला उदयनराजेंविरोधात अजूनही उमेदवार सापडला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी चर्चेत होते. पण काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कऱ्हाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात उभे राहण्याची हिंमत पृथ्वीराज यांना झाली नाही व ते घाबरून पळाले असा टोला शेलारांनी लगावला आहे. 

Vidhan Sabha 2019 : अमित शहांना पंकजा मुंडे दाखवणार सावरगांवात ताकद

उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा!
सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे "पृथ्वीअस्त्र" भयभीत होऊन पळाले..
भाजपचे विरोधक सारे गारद झाले. दिल्ली.. अमेरिकेच्या तख्तापर्यंत गरजतात सारे!गरजा महाराष्ट्र माझा! असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar criticizes Prithviraj chavan against udayanraje bhosale