
मुंबई : राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केले आहे. हा उत्सव पहिल्यांदा राज्य सरकार साजरा करीत असल्यामुळे या उत्सवाचे स्वरूप व्यापक करण्याकरिता सरकार प्रयत्नशील आहे. या उत्सवात सरकारचा फोकस ऑपरेशन सिंदूर, युनोस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेले छत्रपतींचे किल्ले, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांवर असणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. २२) सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत राज्य, पालिका तसेच केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.