सरकार आश्वासनावर कृतकृत्य!

अशोक चव्हाण यांची टीका ; ‘वेदांत-फॉक्सकॉन’वरून केले लक्ष्य
Ashok Chavan criticize Vedanta-Foxconn state govt narayan rane Barack Obama mumbai
Ashok Chavan criticize Vedanta-Foxconn state govt narayan rane Barack Obama mumbaisakal

मुंबई : भविष्यात मोठा प्रकल्प येण्याच्या आशेवर वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प पळविण्याच्या गंभीर बाबीचा विसर पडून केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य होते, हे निराशाजनक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राचे महत्त्व लक्षात घेता काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत भेटीवर येणारे बहुतांश राष्ट्रप्रमुख व विदेशी शिष्टमंडळे आवर्जून देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही दौरा करायचे. त्यासाठी केंद्र सरकारदेखील प्रोत्साहन व सहकार्य द्यायचे. राज्याचा उद्योगमंत्री व मुख्यमंत्री म्हणून मी अशा अनेक विदेशी शिष्टमंडळांना भेटलो आहे. मुख्यमंत्री असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांचेही मी मुंबईत स्वागत केले आहे.

मात्र, मागील काही वर्षांत विदेशी राष्ट्रप्रमुखांचे मुंबई दौरे जणू बंद झाले आहेत. यापश्चातही अनुकूल औद्योगिक वातावरणामुळे जे प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छितात, त्यांना इतर राज्यांमध्ये पळवून नेले जाते आहे. महाराष्ट्रात अगोदरपासून सुरू असलेले प्रकल्प, कार्यालये आणि व्यवसायांचीही पळवापळवी सुरू आहे. ही संपूर्ण परिस्थिती अतिशय गंभीर व चिंतनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून याबाबत भूमिका घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राशी संवाद ठेवलाच पाहिजे. मात्र, याचा अर्थ महाराष्ट्राने अगतिक व्हावे असा होत नाही. महाराष्ट्राची क्षमता व गुणवत्तेनुसार हक्काचे ते मिळालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका चव्हाण यांनी यावेळी मांडली.

बंद खोलीतील तडजोडीनेच प्रकल्प राज्याबाहेर गेले : राणे

मुंबई : राज्यात गेल्या अडीच वर्षांत बंद खोलीत बसून तडजोडी केल्याने महाराष्ट्रातील उद्योग इतर ठिकाणी गेल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री होते; तेव्हा उद्योगक्रांती का केली नाही, असा सवालही राणे यांनी विचारला.

वेदांत आणि फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले असतानाच राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वेदांता आणि ‘फॉक्सकॉन''बाबत चर्चा करणार असल्याचे समजते. हा प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत.

सत्ताधारी व विरोधकांत आता वेदांत आणि फॉक्सकॉन उद्योग गुजरात गेल्याने आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्यातील उद्योग गेल्याचा आरोप करीत विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर शिंदे- राणे यांची भेट झाली. राणे म्हणाले, “कोकणातील काही प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मी फॉक्सकॉनच्या वादात नाही. मात्र, आपल्या राज्यातील उद्योग कोणामुळे कुठे गेले हे सगळ्यांना ठाऊक आहे. याआधीच्या सरकारनेच उद्योग इतरत्र पाठविले. पवार हे गैरसमज पसरवत आहेत.’’

खरे तर वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी पंतप्रधानांचा हस्तक्षेप अपेक्षित होता. मात्र, राज्य सरकारच्या प्रतिक्रियेवरून तसे झालेले जाणवत नाही. त्याऐवजी भविष्यात महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन मिळाले आहे. भविष्यात जे मिळेल ते मिळेल. महाराष्ट्राच्या अविकसित भागात केंद्राने एखादा मोठा प्रकल्प निश्चितपणे दिला पाहिजे. त्याचे आम्ही स्वागतच करू. मात्र, अगोदर वेदांत-फॉक्सकॉन परत द्यायला हवा. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नसतो, हे राज्य सरकारने ध्यानात ठेवावे.

- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com