esakal | आरे वृक्षतोड कारवाईत वादात राहिलेल्या अश्विनी भिडे यांचं प्रमोशन
sakal

बोलून बातमी शोधा

आरे वृक्षतोड कारवाईत वादात राहिलेल्या अश्विनी भिडे यांचं प्रमोशन
  • महाविकास आघाडी सरकाचा पहिला वेगळा निर्णय

आरे वृक्षतोड कारवाईत वादात राहिलेल्या अश्विनी भिडे यांचं प्रमोशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई मेट्रो च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येतेय. कालच महाविकास आघडीच्या सरकारमधील मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे आणि लगेच त्यानंतर अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. 

सध्या मुंबई मेट्रो च्या व्यवस्थापकीय संचालिका असणाऱ्या अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अश्विनी या मेट्रो च्या प्रकल्प संचालिका म्हणून काम पाहणारच आहेत, या व्यतिरिक्त अश्विनी भिडे यांना प्रधान सचिव पदी बढती मिळाली आहे.

धक्कादायक :  मंत्रालयातील केबिन नंबर 602, एक श्रापित दालन ? 

मुंबईतील सध्या मेट्रोचं काम जोरात सुरु आहे. अशात मुंबईत मेट्रो च्या कारशेड वरून मोठा वादंग झाला. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील करण्यात आली. यावेळी स्वतः कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर ठपका ठेवत ट्विटरच्या माध्यमातून आरोप देखील केले होते. आमचं सरकार आल्यावर आम्ही याबाबत लक्ष घालू असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. 

धक्कादायक :  मोलकरणीशी शारीरिक लगट करायला गेला पण...

कालच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यानंतर आलेली पहिली मोठी बातमी म्हणजे अश्विनी भिडे यांची पदोन्नती. अश्विनी भिडे या सध्या ज्या पदावर आहेत ती कामं पाहणार आहेतच, या व्यतिरिक्त त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. मिळालेली पदोन्नती प्रधान सचिव या विभागातील आहे. 

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 'आरे बचाओ'मध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मनाला जातोय. कारण, त्यांनी अश्विनी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.

धक्कादायक : तो तिला सोडून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवायचा आणि...
 
गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीवर स्थगिती सरकार असल्याचा आरोप लावला जात होता. अशात ठाकरे सरकारने घेतलेला पहिला वेगळा निर्णय आज महाराष्ट्राला पाहायला मिळतोय. दरम्यान अश्विनी भिडे यांना मिळालेली पदोन्नती म्हणजे मुंबईतील मेट्रोच्या कामांवर कोणत्याही प्रकारची बंदी येणार नाही याचंच हे द्योतक मानलं जातंय.   

WebTitle : ashwini bhide mmrcl md promoted as principal secretory :