

Asiatic Society Elections
ESakal
मुंबई : मुंबईच्या ग्रंथसंपदा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. निवडणूक लांबण्यामागे मतदार यादीतील घोळ हे कारण व्यवस्थापन समितीने पुढे केले असले, तरी तब्बल तीन महिने उलटूनही केवळ १,६०० नव्या सदस्यांच्या मतदार यादीचा घोळ दूर का हाेऊ शकत नाही, असा सवाल व्यवस्थापन समितीतील काही सदस्यांनी उपस्थित केला आहे.