

Raj Thackeray
ESakal
२०२६ च्या बीएमसी निवडणूकीपूर्वी, उद्धव आणि राज ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी २० वर्षांहून अधिक काळानंतर मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर एकाच व्यासपीठावर संयुक्त सभा घेतली आहे. या सभेमध्ये ठाकरे बंधुंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, २० वर्षांनी पहिल्यांदा युती झाली आहे. त्यामुळे प्रक्रियेत काही लोकांना तिकीटं दिली गेली. अनेकांना देता आली नाही. अनेक जण नाराज झाले.