
Atal Setu Potholes in Just 17 Months Contractor Fined 1 Crore
Esakal
Atal Setu Bridge Damage: अटल सेतू हा मुंबई ते नवी मुंबई या दरम्यान सुलभ प्रवासासाठी बांधण्यात आलेला सागरी सेतू आहे. दीड वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. पण आता १८ महिन्यातच या अटल सेतूची दुरवस्था झाल्याचं चित्र दिसून येतंय. अटल सेतूचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नवी मुंबईच्या दिशेनं जाताना तीन मोठे खड्डे पडल्याचं यात दिसतंय. हे खड्डे बुजवण्याचं काम एमएमआरडीए करत आहे.