Atal Setu : अटल सेतूचे लोकार्पण; वाहतुकीसाठी सुरु होण्याची मुंबईकरांना उत्सुकता

मुंबई महानगर प्रदेशाला आणि राज्याच्या विकासाला एक दिशा देणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
atal-setu
atal-setusakal

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशाला आणि राज्याच्या विकासाला एक दिशा देणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. दक्षिण मुंबईतील कुलाबा ते शिवडी पर्यंतच्या परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूकीसाठी हा पूल केव्हा खुला होईल याची उत्सुकता वाहनचालकांना लागली आहे.

बॉम्ब शोध, दंगल पथक, वाहतूक पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एरवी फेरीवाले हा मार्ग तसेच संपूर्ण फुटपाथ व्यापून टाकतात. मात्र आज सर्व फूटपाथ मोकळे होते. या परिसरात पेट्रोलीयम कंपन्या असल्याने या मार्गावर टँकर, ट्रक, अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. मात्र या मार्गावर वाहने उभी कऱण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.

सकाळी पासून या भागात वाहतूकीस प्रतिबंध घालण्यात आला होता.त्यामुळे नेहमी धुळ व खड्याचे साम्राज्य असलेला मार्ग धूळ मुक्त व स्वच्छ दिसत होता. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या तीनही राजकीय पक्षांचे झेंडे अटलसेतूवर दुतर्फा लावून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या गाडीचा ताफा बीपीटी मार्गावर आला तेव्हा काही वेळा साठी मुक्त मार्गाच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळा करिता बंद करण्यात आली होती. पोलीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्याचा ताफा निघून गेल्यावर इथली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.अटल सेतूचे अधिकृत उदघाटन झाले. मात्र पूल वाहतूकीकरीता केव्हा खुला होईल याची वाट मुंबईकरांना आहे.

अटल सागरी सेतूचे लोकार्पण झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो. या सागरी मार्गावरून प्रवास करण्याचा एक वेगळाच आनंद व अनुभव मिळणार आहे. त्याची उत्सुकता आहे.

- अरुणा सयाजी जाधव (गृहिणी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com