शिक्षक मारहाणप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

खालापुरातील खरसुंडी शाळेतील प्रकार

खालापूर : खालापुरातील खरसुंडी शाळेतील शिक्षकाला चारजणांनी शाळेतच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - फडणवीसांना आणखी एक धक्का

रमेश नामदेव देवरूखकर (वय ३७, रा. निळजे, डोंबविली) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहेत. सोमवारी (ता. १२) शाळा सुरू असताना चार अज्ञात व्यक्‍तींनी रमेश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाची बातमी - निवडणूक आयोगाकडून मनसेला नोटीस

रमेश यांना धक्का मारत विद्यार्थ्यांसमोर दमदाटी करत लाथा-बुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. घाबरलेल्या शिक्षक रमेश यांनी खालापूर पोलिस ठाणे गाठत चौघा अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे. रमेश यांनी तक्रारीत चौघांनी तो अनुसूचित जाती-जमातीचा आहे हे माहिती असूनदेखील जाणीवपूर्वक अपमान करत जबर मारहाण केल्याची तक्रार दिल्यानंतर खालापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

web title : Atrocity on four persons beating teacher


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocity on four persons beating teacher