लग्नाआधी शिवदीप लांडे पगारातील ६० टक्के रक्कम देत होते समाज सेवेसाठी

लग्नाआधी शिवदीप लांडे पगारातील ६० टक्के रक्कम देत होते समाज सेवेसाठी

मुंबई: गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर छडा लागला. महाराष्ट्र एटीएसचे (दहशतवाद विरोधी पथक) डीआयजी शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याची माहिती दिली. शिवदीप लांडे यांची कहाणी ही एका स्टारपेक्षा कमी नाही आहे. लांडे सध्या त्यांचं मूळ राज्य महाराष्ट्रात तैनात आहेत. त्याआधी ते बिहारमध्ये तैनात होते. आता लांडे यांची एटीएसचे डीआयजी मुंबई येथे बदली झाली. 

महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात अत्यंत गरीब कुटुंबात लांडे यांचा जन्म झाला. अकोल्यात राहणारे लांडे यांचे वडील शेतकरी तर त्याची आई गृहिणी आहे. सुरुवातीला पाटणा येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर लांडे यांना लवकरच त्यांच्या कार्यशैलीसाठी लोकप्रियता मिळाली.

शिवदीप लांडे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या ममता यांच्याशी लग्न केलं आहे. शिवदीप आणि ममता यांची ओळख एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली. लांडे यांनी सांगितलं की, लग्नापूर्वी सामाजिक कार्यासाठी मी माझ्या पगारातील ६० टक्के रक्कम मदत म्हणून देत होतो. 

मनसुख हिरेन प्रकरणात मात्र रविवारी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिली आहे. 'अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणाचं गूढ उकलण्यात आम्हाला यश आलं आहे. मी माझ्या एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सलाम करतो. त्यांनी या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीचा दिवस करून न्यायपूर्ण पद्धतीने प्रकरणाचा तपास केला. हे प्रकरण माझ्या पोलीस दलातील कारकीर्दीमधील कठीण प्रकरणांपैकी एक होते', अशी फेसबुक पोस्ट शिवदीप लांडे यांनी केली.

 मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश गोरे याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्यानंतर शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणाचा गुंता सुटल्याचे सांगितले. 

Ats dig Shivdeep Lande donate 60 percent of his salary for social causes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com