ठाण्यात बँक दरोड्याचा प्रयत्न ; दहा हजारांची रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात बँक दरोड्याचा प्रयत्न ; दहा हजारांची रोकड लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे स्थानक परिसरातील एका बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी बँकेच्या खिडकीच्या सळ्या वाकवून आत प्रवेश केला. बुधवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात चोरट्याला बँकेतील लॉकर उघडणे शक्य न झाल्याने त्याने कर्मचाऱ्यांच्या खणातील दहा हजार रुपये घेऊन पोबारा केला.

आनंद सिनेमाच्या मागे बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या बँकेच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीच्या सळ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचे बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी तपास सुरू केला. या परिसरातील आणि बँकेतील सीसी टीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आली असून त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: देशाला मिळली दोन नवीन संरक्षण कार्यालयं, PM मोदींनी सांगितले फायदे

या बँकेच्या शेजारीच एटीएम आहे. त्यासाठी एक सुरक्षारक्षक तैनात असतो. मात्र, बँकेच्या सुरक्षेसाठी कोणतीच व्यवस्था नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. बँकेत घडलेल्या या प्रकारानंतर बँकेची शाखा काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे फलक लावण्यात होते.

loading image
go to top