मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जरा त्यातही... लक्ष घाला!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

उरण परिसरातील एनएमएसईझेड क्षेत्रात कांदळवन आणि पाणथळीचा होत असलेल्या विनाशाविरोधात पर्यावरणप्रेमी सातत्याने ओरड करत आहेत. त्यांच्यामार्फत या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात येत असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण विभागाला या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नवी मुंबई : उरण परिसरातील एनएमएसईझेड क्षेत्रात कांदळवन आणि पाणथळीचा होत असलेल्या विनाशाविरोधात पर्यावरणप्रेमी सातत्याने ओरड करत आहेत. त्यांच्यामार्फत या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात येत असल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण विभागाला या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? अबब... एवढा मोठा मासा जाळ्यात!

"नेचर कनेक्‍ट', "एकविरा प्रतिष्ठान' आणि "पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती'तर्फे उरण येथील पाणजे, पागोटे, भेंडखळ या एनएमएसईझेड क्षेत्रातील नष्ट होणाऱ्या कांदळवन आणि पाणथळ जागांच्या बचावासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा दिला जात आहे. या संस्थांनी मुख्यमंत्री कार्यालयात याविषयी तक्रार करत त्यांचेही या विध्वंसाकडे लक्ष वेधले होते. त्यावर केवळ 3 दिवसांत उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. कांदळवन, पाणथळ संरक्षण संवर्धन समितीकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे महसूल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देत कांदळवन, पाणथळचे नुकसान होत असल्याचे मान्य केले होते. तसेच एनएमएसईझेडच्या अधिकाऱ्यांविरोधात (कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नमूद न करता) पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने केवळ कागदावर अधिकाऱ्यांचे नाव न घेता गुन्हा नोंदवून नाही; तर प्रत्यक्षात कारवाई करणे भाग पडेल, असा विश्वास नेचर कनेक्‍टचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केला. 

ही बातमी वाचली का? म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि...

एमएमएसईझेडकरिता पाणजे ताब्यात घेण्यापूर्वी महसूल विभागाने दिलेल्या अहवालात, पाणजेत मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय ती जागा राज्य सरकारच्या ताब्यात होती. येथे फार पूर्वीपासून मच्छीमारी केली जात होती. मच्छीमारांचा व्यवसाय वाचण्यासाठी देखील पाणजेचे संरक्षण होणे गरजेचे आहे. 
- तुकाराम कोळी, पारंपरिक मच्छीमार कृती समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention to panthal mangroves Damages! Notice to Chief Minister Uddhav Thackeray's Environment Department