esakal | मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या

ट्विट करुन अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन...कोणी केले असं वक्तव्य, जाणून घ्या

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी शरद पवारांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शरद पवारांनीही गुरुवारी तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. तर दुसरीकडे शरद पवारांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. 

ट्विट करुन अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी लिहिलं की, पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पक्षाकडून मुंडेंना दिलासा 

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.  रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आली होती. ही बैठक तीन तास चालली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख,  जयंत पाटील,  जितेंद्र आव्हाड उपस्थित होते . ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक झाली.

हेही वाचा- रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार  

या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या बाबत चर्चा करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे विचारपूर्वक आणि जाणून बुजून पद्धतीने करण्यात आले, शिवाय भाजपच्या एका नेत्याने त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण म्हणजे ब्लॅकमेलिंग असावं, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवाय या प्रकरणातील काहीच निर्णय नसेल पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा अशी मागणीही करण्यात आली.

Atul Bhatkhalkar criticism Sharad Pawar Chief Minister Uddhav Thackeray Dhananjay Munde case