अतुल्य मफतलाल यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atulya mafatlal

योगेंद्र मफतलाल समूहाचे उद्योजक अतुल्य मफतलाल (वय ६०) यांचे आज पहाटे मुंबईत झोपेतच निधन झाले.

अतुल्य मफतलाल यांचे निधन

मुंबई - योगेंद्र मफतलाल समूहाचे उद्योजक अतुल्य मफतलाल (वय ६०) यांचे आज पहाटे मुंबईत झोपेतच निधन झाले.

त्यांना काल रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. आज पहाटे ते चार वाजता तशाच अवस्थेत उठले, मात्र ते नंतर पुन्हा झोपायला गेले. मात्र नंतर त्यांचे सेवक त्यांना सहा वाजता उठवायला गेले असता ते मृत झाल्याचे आढळून आले. त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अजय व अतुल्य या दोघा भावांमधील संपत्तीच्या वादामुळे ते दोघे चर्चेत आले होते. अतुल्य यांचे दोन विवाह झाले होते. मफतलाल उद्योगसमूह रसायने, कापड यांच्या उत्पादनात होता. योगेंद्र मफतलाल यांच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबात अनेक वाद उफाळून आले. अजय-अतुल्य यांच्या वादात त्यांचे घरही विभागले गेले होते.

Web Title: Atulya Mafatlal Passed Away Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathMumbai