...अन् सात महिन्यांच्या बाळाला मिळाली आईची माया

मयूरी चव्हाण-काकडे
सोमवार, 11 मे 2020

आईविना पोरक्‍या झालेलं चार महिन्यांचं बाळ 

आईच्या दुधाविना बाळ झाले होते पोरके

डोंबिवली : रविवारी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यातच आईविना पोरक्‍या झालेल्या एका बाळालाही आईची माया मिळाल्याने मातृत्त्वाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. झाले असे, की यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा 4 मे रोजी मृत्यू झाला; मात्र त्यानंतर या महिलेच्या सात महिन्यांच्या बाळाने बाहेरच्या दुधाला तोंडही लावले नाही. आईच्या मायेने सतत व्याकुळ झालेल्या मुलाला आता दिवा येथे राहणारी बाळाची काकू आईची माया देणार आहे. दिवा ते दिग्रस प्रवासात सर्वांत मोठा अडथळा होता तो लॉकडाऊनचा; मात्र या बाळाचे रडणे प्रशासनाच्याही कानी पडले अन्‌ अखेर बाळाच्या काकूने दिग्रस गाठले.

हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात; राज्यात २५ हजार कंपन्या सुरु, सहा लाख कामगार रुजू

यवतमाळच्या दिग्रसमध्ये राहणाऱ्या निशा राठोड यांचा 4 मे रोजी छातीतली गाठ फुटून मृत्यू झाला. निशा यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाच्या मायेचे छत्र हरपले. हे बाळ फक्त आईचे दूध पित होते; मात्र आईच नसल्याने बाळाला विकतचे दूध पाजण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला; मात्र बाळ या दुधाला तोंडही लावत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते.

रायगड एक्‍स्प्रेस सुधीर तांडेल यांचे निधन 

श्‍यामसुंदर राठोड हे दिवा शहरात वास्तव्याला आहेत. शिवाय त्यांनाही लहान मुलगा आहे. त्यामुळे आपण यवतमाळला जाऊन भावजयीच्या सात महिन्यांच्या मुलाला आपले दूध पाजून मायेचे छत्र देऊ, असे मत श्‍यामसुंदर यांच्या पत्नीने व्यक्त केले; मात्र लॉकडाऊनमुळे गावी कसे जायचे, हा प्रश्‍न होता. 

 

रतन खत्री होता तरी कोण? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राठोड कुटुंबीयांच्या पाससाठी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना तातडीने पास मिळवून दिला. दिव्यातून राठोड कुटुंब दिग्रजला दाखल झाल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली. त्यामुळे आता आईच्या मायेला पारख्या झालेल्या चिमुकल्यालाही काकूच्या रूपात असलेली दुसरी आई मायेचे छत्र देणार आहे. 
The aunt gave the baby mother's love


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The aunt gave the baby mother's love