रतन खत्री होता तरी कोण? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

रतन खत्री होता तरी कोण? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

मुंबई : मटका किंग रतन खत्री याचे शनिवारी मुंबईत निधन झाले. 
गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेला खत्री मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटूंबासोबत राहत होता. परंतु रतन खत्री होता तरी कोण? या वाईट धंद्यात तो कसा आला? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

अंडरवर्ल्डपासून गॅंगवारपर्यंतच्या दहशतीत मुंबईच्या उदरात जन्माला आलेल्या अनेक वाईट धंद्यापैकी एक होता मटका. आकड्यांच्या या खेळाने अनेक संसारांची राखरांगोळी केली असली तरी रतन खत्रीने 
मात्र, यात बक्कळ माया कमावली. मटक्याच्या नादात असलेल्यांसाठी रतन खत्री हिरो होता तर जे संसार त्याच्यामुळे विस्कटले त्याच्यासाठी व्हिलन.
गँगवॉर ज्या काळात मोठ्या प्रमाणात उफाळला होते, अशा परिस्थितीतही काळ्या दुनियेतील सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून मटक्याच्या धंद्याला त्याने सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले होते.

सुरुवातीला या क्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी तो कल्याण भगत याच्याकडे काम करत होता. न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज बाजारातील घडामोडींवर मटक्याचे आकडे ठरविण्यात येत असत. 1960 च्या दशकात मटक्याच्या व्यवसायाने मुंबईत चांगलेच बस्तान बसवले होते. रतन खत्री भगतला मॅनेजर म्हणून रुजू झाला होता. 1964 मध्ये खत्री आणी भगत वेगळे झाले आणि त्याने स्वत: चा 'रतन मटका' सुरु केला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढून मटका लावला जायचा. ही पध्दत इतकी प्रचलित झाली की या जुगाराची उलाढाल दररोज एक कोटी रुपयांपर्यंत गेली. 

झटपट आणि कुठलीही मेहनत न घेता मोठं होण्याच्या नादात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या चुकीच्या मार्गाकडे आकर्षीत व्हायचे. त्याचे नेटवर्क अगदी ठाण्यापर्यंत पसरले होते. ऐवढेच नाही तर राज्य सरकारच्या लॉटरीप्रमाणे एक 
समांतर लॉटरी व्यवस्था त्याने उभी केली होती. काही उच्चभ्रूंना देखील मटक्याने वेड लावले होते. अनेकांचे संसार उद्वस्त झाले होते. त्या काळात मटका म्हटला की त्याच्यामागे कुणीतरी गँगस्टर असणार हे ठरलेलेच होते. पण खत्रीबाबत मात्र, अशी काही अप्रिय घटना ऐकल्याचे कुणाला ऐकिवात नाही. रतन खत्री आणि त्याचे कुंटुब मुळचे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातले होते. फाळणीच्या वेळी तो आपल्या परिवारासोबत मुंबईला आला.

1960 मध्ये मटका किंग सुरेश भगतसोबत त्याने काम केले. त्यानंतर 1964 मध्ये स्वतःचा 'वरली मटका' सुरु केला. काही वर्षात त्याने बेटींगच्या धंद्याचं
स्वरुप पालटवून, देशभर  बेकायेशीर मटक्याचे नेटवर्क उभे केलं. त्याने चिक्कार पैसा कमावला, त्यातील काही पैसै बॉलिवूडमध्ये देखील गुंतवले. 
आर्थिक अडचणीच्या वेळी कित्येक बॉलिवूड निर्माते त्याच्या दारावर उभे असायचे अस म्हटलं जात. फिरोज खानच्या धर्मात्मा चित्रपटातील 
प्रेमनाथ नावाचे पात्र हे रतन खत्रीवर आधारीत होते. रंगीला रतन नावाचा चित्रपटाचा तो सहनिर्माता होता. आणीबाणीच्या काळात रतन खत्रीला १९ महिन्यासाठी तुरुंगात टाकण्यात आलं होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com