

Fire fighting system
ESakal
रवींद्र गायकवाड
नवीन पनवेल : कामोठेतील आंबे श्रद्धा इमारतीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या आगीत मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने शहरातील बंद असलेल्या अग्निशमन यंत्रणांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या आहेत; पण दुर्लक्षामुळे भविष्यात अशा घटनांमधून मोलाचा जीव संकटात सापडण्याची शक्यता आहे.