लग्नासाठी जमा केलेल्या पैशांनी 'तो' करतोय 'हे' कौतुकास्पद काम, वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा.. 

auto driver
auto driver
Updated on

मुंबई: कोरोनामुळे एकीकडे संपूर्ण देशात भयाचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात भर म्हणून दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १ लाखच्या पार पोहोचला आहे. सर्व जण कोरोनाच्या या संकटाचा सामना करत आहेत. मात्र काही सामान्य लोकं असामान्य असं काम करून आपल्या सर्वांनाच प्रेरणा देण्याचं काम करत आहेत. असंच एक अभिमानास्पद काम ठाण्यात राहणारा एक ऑटो चालक करतो आहे. 

देशाच्या विविध राज्यात अडकलेले मजूर आणि इतर लोक सध्या आपल्या गावी जात आहेत. काही मजूर तर पायी प्रवास करत आहेत. देशात सध्या सर्व रुग्णालयातले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. म्हणूनच त्यांना कोरोना योद्धे म्हंटलं जातंय. मात्र त्यांच्याप्रमाणेच सामान्य नागरिकसुद्धा कोरोनायोद्धे म्हणून काम करताना दिसत आहेत. ठाण्यात राहणारा एक ऑटो चालकसुद्धा सध्या असंच काम करतोय. 

ठाण्याच्या टिंबर बाजार या परिसरात राहणारा अक्षय कोठावळे नावाचा ऑटो चालक सध्या श्रीमंतांनाही लाजवेल असं काम करतोय. लग्नासाठी साठवलेल्या तब्बल २ लाख रुपयांमधून अक्षय गरीब, मजूर, वृद्ध आणि गर्भवती महिलांची मदत करत आहे. याशिवाय वृद्ध रूग्ण आणि गर्भवती महिलांना विनाशुल्क रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करत आहे. 

तसंच अक्षय या पैश्यातून पायी प्रवास करणाऱ्या मजुरांना आणि स्थलांतरितांना भोजन पुरवण्याचं काम करतो आहे. आपल्या मित्रांची मदत घेऊन भुकेलेल्यांना पोळी-भाजी वाटण्याचं काम त्यानं सुरू केलं आहे. २५ मे ला अक्षयच्या लग्नाची तारीख ठरली होती त्यासाठी त्यानं पैसेही साठवले होते. मात्र लॉकडाऊन वाढल्यामुळे त्यानं विवाह तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

''मी लोकांना रस्त्यावर हलाखीचं जीवन व्यतीत करताना पाहिलं आहे. त्यांना नीट अन्नही मिळत नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठीची त्यांची केवीलवाणी धडपड मला दिसत होती. हे दृश्यं पाहून मी मनातून खचून गेलो आणि काही मित्राच्या सोबतीनं मी या लोकांची मदत कऱण्याचा निर्णय घेतला,'' असं अक्षयनं सांगितलंय. 

सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या अभिमानास्पद कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या लग्नासाठी जमा केलेल्या पैशांनी गरजू लोकांना निस्वार्थ मदत करणाऱ्या अक्षयला सलाम.    

Auto driver helping poor people from money he saved for his wedding rea full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com