प.रे.वर दहा ठिकाणी बसविणार स्वयंचलित पर्जन्यमापक ! रेल्वेला कळणार पावसाचा अचूक अंदाज !

Mumbai-Local-Train
Mumbai-Local-Trainsakal

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. त्यामुळे लोकल आणि लांब पल्याच्या रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा होतो. मात्र, आता पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदीं ठेवून रेल्वेची

वाहतुक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान १० स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येत आहे. त्यामुळेपश्चिम रेल्वेला पावसाळ्यात पावसाची अचूक नोंदी घेण्यात येणार आहेत.

Mumbai-Local-Train
Farmer : शेतकऱ्यांची व्यथाच न्यारी! कवडीमोल भाव मिळत असल्याने तोडली पेरुची झाडे

मुंबई उपनगरात दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो,काहीच कालावधी मुंबईच्या सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. याच्या परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडतो. त्यामुळे मुसळधार पावसातही रेल्वे सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आणि रेल्वेमार्गावर किती पाऊस पडतो याचा अंदाज घेण्यासाठी चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक उपकरणे बसवली जाणार आहे.

या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रांमुळे प्रत्येकी १५ मिनिटांनी पडणाऱ्या पावसाची माहिती गोळा होणार आहे. त्याआधारे पुढील कालावधीतील अंदाज बांधणे शक्य ठरणार आहे. त्या पद्धतीमुळे लोकल, मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे नियोजन करण्यात रेल्वेला मोठी मदत होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Mumbai-Local-Train
Job : आरोग्य विभागात बंपर भरती! 'या' संवर्गातील ४ हजार ७५१ पदे भरली जाणार

या ठिकाणी बसनविणार पर्जन्यमापक

चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी रेल्वेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते.आता सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते विरार दरम्यान १० स्वयंचलित पर्जन्यमापक उपकरणे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या, वांद्रे आणि खार दरम्यान एक स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. दादर , अंधेरी, ग्रण्ट रोड, गोरेगाव, सांताक्रुझ, बोरीवली, वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकात यंत्र लावण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com