esakal | मुंबईत विकास कामांसाठी 485 झाडांवर कुऱ्हाड : वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत विकास कामांसाठी 485 झाडांवर कुऱ्हाड : वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) पालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी तब्बल 485 झाड तोडण्यात येणार आहे. वृक्ष प्राधिकरण बैठकीत यासंबंधी दहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या झाडांच्या बदल्यात 1076 झाडेही नव्याने लावण्यात येणार असून 179 झाडे पुर्नरोपित करण्यात येणार आहेत. पर्यावरण संरक्षक संघटनांनी मात्र झाडे तोडण्यास विरोध दर्शविला असून वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबईत कोणत्याही प्रकल्पासाठी,विकास कामांसाठी झाडे कपावी लागणार असतील तर त्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. तर एकाच कामासाठी 200 हून जास्त झाडे कापायची असल्यास राज्य सरकारची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. यानुसार 200 पेक्षा अधिक झाडे कापण्याचे दोन प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण बैठकीत होते ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

आरे मधील झाडांच्या संरक्षणासाठी मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्यात आली. मात्र दुसरीकडे विविध विकासकामांसाठी शेकडो झाडे तोडावी लागणार आहेत.

हेही वाचा: रशियातील ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या बैठकीत महाराष्ट्राला मान

मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, राज्य सरकारच्या अखत्यारीमधील झाडे तोडण्याबाबतात एकूण 22 प्रस्ताव मांडण्यात आले. यातील दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले.

वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडांच्या बाबतीत 'मैत्रीपूर्ण सामना' खेळला जातो. समितीमधील सदस्यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशनचे गॉडफ्राय पिमेंटा यांनी केला आहे. अनेक सदस्य पर्यावरण तज्ञ नसल्याने त्यांच्याकडून पर्यावरणाचे हित जोपासले जाईल असे वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ही समिती बरखास्त करावी. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री आणि पर्यावरण विभागाकडे रीतसर तक्रार केली असल्याचे ही पिमेंटा म्हणाले.

loading image
go to top