esakal | अभिनेता साहिल खानच्या विरोधात आयेशा श्रौफ यांनी दाखल केली फौजदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अभिनेता साहिल खानच्या विरोधात आयेशा श्रौफ यांनी दाखल केली फौजदारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पाच वर्षांपूर्वी अभिनेता साहिल खानच्या (Sahil Khan) विरोधात आयेशा श्रौफ (Asheya Shroff) यांनी दाखल केलेली फौजदारी फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केली. साहिल आणि श्रौफ यांनी सामंजस्याने वाद सोडविला असे न्यायालयात सांगितले आहे.

अभिनेता जैकि श्रौफची आयेशा पत्नी आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांनी खानविरोधात दोन तक्रारी केली होती. व्यवसायातील सुमारे चार कोटी रुपये खानने परत केलेले नाही, असे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या फिर्यादी रद्दबातल करण्यासाठी साहिलने न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खान आणि तक्रारदार श्रौफ यांच्या वतीने वकिलांनी सांगितले की, या वादावर सामोपचाराने तोडगा काढलेला आहे. त्यामुळे फिर्याद रद्दबातल करायला हरकत नाही. खंडपीठाने दोघांचे विधान नोंदवून घेतले आणि फिर्याद रद्द केली.

हेही वाचा: मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघात ! एक ठार, एक जखमी

याचबरोबर खंडपीठाला खानला एक लाख रूपयांचा दंडही सुनावला. यंत्रणेचा गैरवापर केल्यामुळे दंड सुनावण्यात आला असून राज्य बाल विकास समितीला दंडाची रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

loading image
go to top