

Baby Humpback Whale Dead in mumbai
ESakal
मुंबई : वांद्रे येथील कार्टर रोड किनाऱ्यालगत शनिवारी (ता. २७) सकाळी सुमारे २६ फूट लांबीचे 'हंपबॅक व्हेल' प्रजातीचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांना सकाळी ६ वाजताच्या सुमारास ऑर्टस क्लबजवळील खडकांमध्ये हे पिल्लू अडकलेल्या अवस्थेत दिसून आले.