नवघर रस्त्याची दुरवस्था

उरण ः नवघर रस्‍त्‍याची झालेली दुरवस्‍था.
उरण ः नवघर रस्‍त्‍याची झालेली दुरवस्‍था.

उरण (बातमीदार) : नवघर ते उरण-पनवेल या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुचाकी व रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात हा रस्ता दुरुस्त न झाल्यास द्रोणागिरी नोड येथे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

उरण-पनवेल रस्त्यावर असलेल्या नवघर बस स्थानकापासून ते नवघरमध्ये जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता नवघर बसस्थानकाला जोडणारा असल्याने उरण पूर्व विभागात व नवघर गावात जाणाऱ्या या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहनांची वाहतूक चालू असते. त्यामुळे मार्गावरील धूळ प्रवाशांच्या नाकातोंडात जाऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे रस्ते जेएनपीटीवर आधारित उद्योगधंद्यांमुळे होणऱ्या अवजड वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. मात्र प्रचंड आर्थिक उलाढाल व नफा कमावणारी जेएनपीटी नैतिक जबाबदारी पाळताना दिसत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात संपर्क केला असता होऊ शकला नाही.

नवघर रस्ता पनवेल व उरण या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. केवळ ३०० मीटरचा रस्ता दुरुस्त करणे जेएनपीटी व सिडकोला सहज शक्‍य आहे; मात्र सिडको व जेएनपीटी प्रशासन प्रवाशांचा अंत पाहत आहे.
- मकरंद पाटील, प्रवासी, नवघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com