बदलापूर : बदलापूर शहरातील सगळ्यात मोठी समस्या असलेल्या वाहतूक कोंडीला आजपासून लगाम लागणार आहे. ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून, शहरातील प्रमुख चौक व मुख्य रस्त्यांवर पालिकेकडून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा, ही काल (ता.१) पासून कार्यान्वित करण्यात आली असल्याने, त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.