Ulhasnagar News : महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय; बसपाने स्वबळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर ठेवण्याच्या उद्देशाने मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
bahujan samaj party contest independently lok sabha election kalyan mumbai
bahujan samaj party contest independently lok sabha election kalyan mumbaiSakal

उल्हासनगर - महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर ठेवण्याच्या उद्देशाने मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उल्हासनगरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कल्याणसह मुंबईतील उमेदवारांची या आठवड्यात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती बसपाचे प्रदेश महासचिव व मुंबई झोनचे प्रमुख डॉ.प्रशांत इंगळे यांनी दिली आहे.

कल्याण लोकसभेसह मुंबई झोन मधील लोकसभा मतदारसंघात हजारो कोटीचे विकास कामे सुरू असल्याचे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत.त्यांचे सांगणे विरोधी पक्षाला खोडता येत नाही.मात्र खरोखर हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे होऊन शहराचा विकास दिसत आहे का?

असा प्रश्न डॉ.प्रशांत इंगळे यांनी यावेळी उपस्थित केला.पत्रकार परिषेदेत ठाणे जिल्हा प्रभारी सुनील मडके,कल्याण लोकसभा अध्यक्ष विनोद भालेराव,ठाणे लोकसभा प्रभारी मधुकर बनसोड यांच्यासह रमेश धनवे,सिध्दार्थ सोनावणे,रविकिरण बनसोडे,दीपक जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान कल्याण लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणीही उमेदवारांच्या अधिकृत नावांची घोषणा केलेली नाही.मात्र शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांना निवडून देण्याकरिता मतभेद विसरून भाजपाने कार्यकर्ते मेळावे घेतले आहेत.

महाविकास आघाडीकडून कल्याण लोकसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे.पण अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.केदार दिघे यांच्या नावाची चर्चा पुढे येऊ लागली आहे.

अशातच बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव व मुंबई झोन प्रमुख प्रशांत इंगळे यांनी स्वबळावर लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले असून कल्याण व मुंबईतील उमेदवार या आठवड्यात जाहीर करण्याचे सूतोवाच केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com