
Bahujan Vikas Aghadi’s Election-Eve Rally Highlights Neglect of Vasai-Virar Roads
Sakal
-संदीप पंडित
विरार: वसई–विरार परिसरातील बिकट रस्त्यांच्या स्थितीवरून बहुजन विकास आघाडीने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार संताप व्यक्त करत माजी आ क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी चार वाजता महानगरपालिका मुख्यालयावर मोठा मोर्चा काडून निवडणुकीपूर्वीच शक्ती प्रदर्शन एका बाजूला केले. दुसर्या बाजूला विधानसभा निवडणुकी नंतर शांत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम केले आहे. बहुजन विकास आघाडीने काढलेला हा पहिलाच मोठा मोर्चा होता.