
आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळ जवळ स्पष्ट असताना काँग्रेसला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव निश्चित मानण्यात येत आहे.
मुंबई : बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसच्या बैठकीनंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. अशात अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला, तर शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालंय. आता चर्चा सुरु झालीये ती पदाच्या वाटपाची. यात सर्वात महत्त्वाची पद आहेत मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळ जवळ स्पष्ट असताना काँग्रेसला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव निश्चित मानण्यात येत आहे.
आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. अशात आता महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यात तशी कमी आहे त्यामुळे या सर्व चर्चेत आता उपमुख्यमंत्रिपदासाठी अशोक चव्हाण यांच्याऐवजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबतच बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रिपदासाठीही देखील पसंती मिळाल्याची माहिती समोर येतेय.
पहिली अडीच वर्षे शिवसेनेला अन् दुसरी अडीच वर्षे...?
संजय राऊत यांचा भाजपला चिमटा
आह शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत म्हटले आहे, की हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था.असं म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे.
Webtitle : balasaheb thorath as deputy cm om maharashtra