esakal | पहिली अडीच वर्षे शिवसेनेला अन् दुसरी अडीच वर्षे...?
sakal

बोलून बातमी शोधा

politics

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार हे निश्चित आहे. काँग्रेसला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत सत्ता फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असून, शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदे मिळणार हेही सूत्रांनी सांगितले आहे.

पहिली अडीच वर्षे शिवसेनेला अन् दुसरी अडीच वर्षे...?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म शिवसेनेकडे असणार असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेला पहिली अडीच वर्षे आणि नंतरची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, यावर सहमती झाली. मात्र, सरकारचे स्वरूप आणि किमान समान कार्यक्रमावर दोन्ही काँग्रेसच्या वाटाघाटी अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. आज पुन्हा एकदा दिल्लीत आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक होत आहे. या बैठकीनंतर सर्वकाही स्पष्ट होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, हे पूर्वीपासून सांगितलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असेल हे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार हे निश्चित आहे. 

आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रमुख नेत्यांची मुंबईत मातोश्रीवर बैठक बोलावली होती. उद्या (शुक्रवारी) सर्व शिवसेना आमदारांची मातोश्रीवर निर्णायक बैठक बोलावण्यात आली असून, त्याबाबतची तयारी करण्याचे नियोजन या वेळी ठरले. सर्व आमदारांनी येताना स्वत:चे आधार कार्ड, पॅन कार्ड व ओळखपत्र घेऊन यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळी बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी पहिली टर्म शिवसेनेकडे असणार हे स्पष्ट केले आहे. 

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार हे निश्चित आहे. काँग्रेसला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत सत्ता फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असून, शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदे मिळणार हेही सूत्रांनी सांगितले आहे.

नव्या आघाडीचं ठरलं!