लोकहो आतापासून मनाची तयारी ठेवा, कोरोनामुळे यंदा मुंबईत फटाक्यांवर बंदी ?

लोकहो आतापासून मनाची तयारी ठेवा, कोरोनामुळे यंदा मुंबईत फटाक्यांवर बंदी ?

मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात यंदाची दिवाळी कोरोनामुळे वेगळी असणार आहे. विशेषतः मुंबईकरांसाठी यंदाची दिवाळी जरा सुनी सुनी जाऊ शकते. दिवाळी हा सर्वांचा आनंदाचा सण, अशात अनेक जण दिवाळीमध्ये फटाके फोडून दिवाळ सण साजरा करतात. चौका चौकात, सार्वजनिक ठिकाणी अगदी समुद्र किनाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीत मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी जाहीर होऊ शकते. बृहन्मुंबई महानगरपालिका याबाबतचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार यंदा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यावर विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितले आहे. 

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीमध्ये वातावरणात गारवा असतो. अशात हवेत फटाक्यांचा धूर साठून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण तर होतेच सोबतच सध्या कोरोनामुळे आजारी असलेल्याना वायू प्रदूषणामुळे श्वास घेण्यास अधिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. वायू प्रदूषणामुळे कोरोना रुग्णांची प्रकृती खालावू देखील शकते. याबरोबर सध्या आपण मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर देखील वापरत आहोत. सॅनिटायझर देखील अतिशय ज्वलनशील असल्याने फटाके फोडताना जळणे, भाजणे किंवा आग लागण्याचेही प्रकार घडू शकतात. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबईत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील फटाके बंदीचा प्रस्ताव मांडणार आहेत. त्यामुळे राज्यातही यंदा दिवाळीत फटाकेबंदी लागू होऊ शकते. या निर्णयाचा फटाके विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. मात्र, कोरोनामुळे हाही कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, त्यासाठीची मनाची तयारी करून ठेवावी असंही राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे.

ban on firecrackers during diwali season in mumbai bmc might declare this decision

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com