

Mumbai Restrictions News
ESakal
आर्थिक राजधानी मुंबईत सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांनी शहरात २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर सक्त मनाई आणि कलम १४४ लागू केला आहे. पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी सोमवारी (२० जुलै) महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हा महत्त्वाचा आदेश जारी केला.