esakal | पुढील वर्षी 'पीओपी' गणेशमूर्तीवर बंदी?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पुढील वर्षी 'पीओपी' गणेशमूर्तीवर बंदी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची मुंबईत (Mumbai) पुढील वर्षासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तीवर बंदी येण्याची शक्यता आहे.

महापालिकेत आज (ता. १) याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिर्धीसह संबंधित प्राधिकरणच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणली आहे. त्यासाठी मंडळाने मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांनी माहिती दिली. घरगुती मूर्तीचे विसर्जन घरातच करण्यास प्राधान्य दिले जावे. असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती बनवण्यासाठी मोठ्या आकाराचा मंडप, तसेच त्यासाठी प्रदीर्घ काळही लागेल. त्यादृष्टीने महापालिकेने मूर्तिकारांना मंडप बांधण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मूर्तिकारांच्या प्रतिनिर्धीकडून करण्यात आली.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये पुन्हा अवतरले सोनसाखळी चोर

यावेळी पालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, मुंबई पोलिसांचे प्रतिनिधी, केंद्र सरकारच्या नीरी संस्थेचे प्रतिनिधी, मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती व प्रतिनिधी उपस्थित होते.

loading image
go to top