येत्या २६ तारखेला बँकीग व्यवहार ठप्प होण्याची शक्यता, देशव्यापी संपात बँकिंग संघटनाही सहभागी होणार

विनोद राऊत
Tuesday, 24 November 2020

२६ नोव्हेंबर पुकारलेल्या संपात स्टेट बँक आणि इंडियन ओवरसिज बँक या दोन बँक वगळता इतर बँकातील संघघटनाचे सदस्य संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे  बँकीग व्यवहार ठप्प होणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. 

मुंबई, ता. 24 :  केंद्र सरकारच्या कामगार विषयक धोरणांच्या विरोधात २६ नोव्हेंबररोजी केंद्रीय मध्यवर्ती कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनही सहभागी होणार आहे. असोसिएशनच्या  सार्वजनिक, जुन्या खाजगी, ग्रामीण, आणि सहकारी बँकात काम करणारे पाच लाखावर सभासद आहे. राज्यात या संघटनेत विवीध बँकात काम करणारे जवळपास 30 हजार कर्मचारी संपात सामील होणार असल्यामुळे बँकाच्या कामकाजावरही संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाची बातमी : "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 

विद्यमान सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत नफ्याच्या उद्योगाचं खासगीकरण करू पाहत आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आहे. यामध्ये IDBI बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँकांची नावे वारंवार घेतली जात आहेत. खाजगीकरणाला प्रक्रीया थांबवण्याची मागणी संघटनेच्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आली आहे. 

एकीकडे खाजगी क्षेत्रातील बँका येस बँक, लक्ष्मी विलास बँक  मोठ्या उद्योगांना वाटलेल्या कर्ज वाटपामुळे अडचणीत येत आहेत. दुसरीकडे सरकार चांगल्या चालणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करून सामान्य गुंतवणूकदारांच्या ठेवी धोक्यात आणू पाहत आहे. एकीकडे सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत आहे आणि दुसरीकडे भारतीय खाजगी बँक लक्ष्मी विलास ते विदेशी डीबीएस बँकेच्या भारतीय कंपनीच्या दावणीला बांधू पाहत आहे. सरकारचे हे दुटप्पी धोरण सामान्य जनांच्या हिताचे नाही. या बाबीकडे बँक ग्राहकांचे तसेच सामान्य जनतेचे लक्ष वेधू इच्छितो असं या संघटनेने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : "रावसाहेब दानवे यांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे, हे आम्हाला माहित नव्हतं" - शरद पवार

२६ नोव्हेंबर पुकारलेल्या संपात स्टेट बँक आणि इंडियन ओवरसिज बँक या दोन बँक वगळता इतर बँकातील संघघटनाचे सदस्य संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे  बँकीग व्यवहार ठप्प होणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. 

काय आहेत मागण्या : 

1. बँकिंग उद्योगातील प्रश्न सोडवा 
2. बँकांचे खाजगीकरण थांबवा 
3. बड्या उद्योगाकडे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर कारवाई करा
4. बँकेतील आऊटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीला विरोध
5. पुरेशी नोकरभरती करा 
6. बँक ठेवीवरील व्याजाचे दर वळवण्यात यावे 
7. बँक सेवा शुल्कात कपात करण्यात यावी

महत्त्वाची बातमी : आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी कंगनाला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा; चौकशीस उपस्थित राहण्याचे आदेश

The banking system is likely to come to a standstill on the 26th of this month due to nation wide strike

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The banking system is likely to come to a standstill on the 26th of this month due to nation wide strike

टॉपिकस
Topic Tags: