esakal | आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी कंगनाला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा; चौकशीस उपस्थित राहण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी कंगनाला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा; चौकशीस उपस्थित राहण्याचे आदेश

वांद्रे पोलिसात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याबाबत सोमवारी कंगनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल देण्यात आला.

आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी कंगनाला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा; चौकशीस उपस्थित राहण्याचे आदेश

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई - समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौत वर वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रे पोलिसात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याबाबत सोमवारी कंगनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल देण्यात आला.

हेही वाचा - "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत !

सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रानौतने वादग्रस्त मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. त्याप्रकरणी वांद्रे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाद्रे न्यायालायने दिले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले होते. तसेच कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वांद्रे पोलिसांनी बजावलेल्या समन्सला कंगना रानौत हजर राहत नव्हती. सोमवारी कंगनाने संबधीत एफआयआर रद्द व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज त्यावर बोलताना न्यायालयाने पोलिसांनी कंगनावर कोणतीही कडक कारवाई करू नये. तसेच कंगनाने 8 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश दिले. याबाबत कंगनाने यापुढे कोणतेही ट्विट करू नये अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे कंगनाला याप्रकरणी तुर्तास दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात यायचं असेल तर दाखवावा लागणार कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल

प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत. मात्र या अधिकारांना मर्यादाही आहेत. त्यामुळे या अधिकारांचा वापर करताना दुसर्याच्या जगण्याच्या अधिकारात बाधा येणार नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

Kangana relieved by High Court in offensive tweet case Order to attend the inquiry

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top