बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती; पुढील आठवड्यात रहिवाशांसोबत करारनामा

bdd chawl
bdd chawlsakal media
Updated on

मुंबई : वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ (BDD chaul) पुनर्विकास प्रकल्पाला (Redevelopment project) गती देण्यासाठी म्हाडा (mhada) मुंबई मंडळाने आणखी एक पाऊल उचलले आहे. या तिन्ही ठिकाणांच्या रहिवाशांसोबत पुनर्वसन सदनिकेचे करारनामा (Agreement) पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वरळी प्रकल्पातील (worli project) पोलिसांचे वापरात असलेल्या जागेला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात असल्याने या महिनाअखेरीस तिन्ही बीडीडी चाळीतील कामांना वेग येणार आहे.

bdd chawl
BMC : रस्ते दुरुस्तीवरुन शिवसेना-भाजप पुन्हा आमने सामने

वरळी, ना.म. जोशी आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे. रहिवाशांच्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारायचे मुद्रांक शुल्क हे प्रश्न रखडल्याने प्रकल्पात अडथळा निर्माण झाला होता. राज्य मंत्रिमंडळाने दस्तावर आकारायचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने वरळी, ना म. जोशी मार्गावरील रहिवाशांना संक्रमण शिबिराचे आणि कायमचे अग्रीमेंट देण्याची तयारी सुरु केली आहे.

ना म जोशी मार्गावरील 272 रहिवाशांना यापूर्वीच संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले आहे. या रहिवाशांची सोडतही म्हाडाने काढली असल्याने या रहिवाशांना प्रथम कायमचे अग्रीमेंट मिळणार आहे. तर वरळी आणि नायगाव येथील पहिल्या टप्यातील इमारतींमधील रहिवाशांसोबतही म्हाडा करारनामा करणार असल्याने या प्रकल्पाला आणखी गती येणार आहे. वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या इमारतींजवळ पोलिसांचे एक गोडाऊन आणि पेट्रोल पंप आहे.

प्रकल्पाला गती देण्यासाठी ही जागा रिकामी करून घेण्याचे प्रयत्न म्हाडाकडून सुरु आहेत. त्यानुसार म्हाडा पोलिसांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहे. सरकारने मुद्रांक शुल्क बाबत निर्णय घेतला आहे. प्राणूत याचा शासन निर्णय अद्याप जारी केलेला नाही. तो लवकर गृहनिर्माण विभागाने जारी करावा, अशी मागणी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.

"बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती देण्यात येत आहे. पुढील आठवड्यात रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहेत. रहिवाशांना भाडे हवे असल्यास म्हाडा त्याबाबतचाही करार करेल. तसेच संक्रमण शिबिराची व्यवस्थाही म्हाडाने केलेली आहे."

- डॉ. योगेश म्हसे - मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com