

मुंबई : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर (Road repairing) शिवसेना-भाजप (shivsena-bjp) पुन्हा आमने सामने आले आहेत. रस्ते दुरुस्तीच्या निवीदांमध्ये (tender) कंत्राटदार (contractor) 40 ते 50 टक्के कमी दाराने (Contract rates) काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत असल्याने ही निवीदा प्रक्रिया रद्द (tender cancelled) करावी अशी मागणी भाजपने आज महानगरपालिकेच्या (bmc) स्थायी समितीत केली. त्यावर भाजपच्या ठेकेदारांना कंत्राट मिळणार नसल्याची भिती असल्याने ही मागणी करण्यात येत असल्याचा प्रतिहल्ला शिवसेनेने चढवला.
रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी महानगर पालिकेने 1200 कोटी रुपयांच्या निवीदा मागवल्या आहेत.या 31 निवीदांमध्ये कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजपत्रका पेक्षा 26 ते 33 टक्के कमी दराने निवीदा भरल्या आहेत.सर्व बाजूंचा विचार केल्यास कंत्राटदार प्रत्यक्षात 40 ते 50 टक्के कमी खर्चात काम करण्यास तयार आहेत.रस्त्यांचा दर्जा घसणार.अशा कामांमुळे मुंबईतील करदात्यांची खड्ड्यांतून सुटका होत नाही असा हरकतीचा मुद्दा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थीत केला.
यामुळे या निवीदा रद्द करुन फेरनिवीदा मागविण्यात याव्यात अशी मागणीही शिंदे यांनी केली. 2014 मध्ये पालिकेत रस्ते दुरुस्तीचा घोटाळा उघड झाला होता.आता हा असाच घोटाळा होण्याची भिती आहे.पालिकेच्या दक्षता विभागा मार्फत फक्त 5 टक्के दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची तपासणी केली जाते.तर,थर्ड पॉटी ऑडीटर नेमण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांसह मिश्र पक्षांनी नाकारली आहे.त्यामुळे निश्चितच घोटाळ्याला वाव आहे असा आरोपही त्यांनी केला.मात्र,अद्याप याबाबतच्या निवीदा अंतिम झालेल्या नाहीत असे सांगत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा हरकतीचा मुद्दा फेटाळला.
श्वेतपत्रिका काढा
रस्ते दुरुस्तीच्या कंत्राटात कठोर नियमांचा आंतर्भाव करावा.आता पर्यंत रस्ते दुरुस्तीवर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो.मात्र,खड्ड्यातून सुटका होत नाही.त्यामुळे गेल्या 25 वर्षातील रस्ते दुरुस्तीच्या कामाची श्वेत पत्रिका काढा.अशी मागणी शिंदे यांनी केला.
रस्त्यांच्या कामात भाजपचा खोडा
रस्त्यांच्या कामात भाजप खोडा घालत आहे.भाजपच्या मर्जीतल्या कंत्राटदाराने काम मिळणार नाही अशी भिती असल्याने हा आरोप केला जात आहे.रस्ते दुरुस्तीची कामे अडवून भाजप विकासाच्या कामात खोडा घालत आहे.असा आरोप यशवंत जाधव यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.