esakal | सावधान ! वाहन चालवताना वेगमर्यादेचे उल्लंघन करताय? आधी ही बातमी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

road.

दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात, तर सुमारे दोन लाख कायमचे जायबंदी होतात.

सावधान ! वाहन चालवताना वेगमर्यादेचे उल्लंघन करताय? आधी ही बातमी वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कासा : दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात, तर सुमारे दोन लाख कायमचे जायबंदी होतात. प्राणघातक अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहन चालविणे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र् राज्यातील राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग व राज्य रस्त्यासाठी वेगवेगळी वेगमर्यादा निर्धारित केली आहे. तशी सूचना अपर पोलिस महासंचालकांयांनी प्रसिद्ध केली आहे.

महत्वाची बातमी : ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील दोन निश्चित ठिकाणातील अंतर वाहनाने किती वेळात पार केले या माहितीच्या आधारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

त्यानुसार आता विविध टोल नाके, सीसीटीव्ही व अन्य प्रकारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मोटार सायकली, प्रवासी कार व अवजड वाहनाची वेग मर्यादेचे उल्लंघन न करता मर्यादित वेगाने चालवा. या सूचना न पाळल्यास वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश महामार्ग पोलिस अधीक्षक ठाणे डॉ. दिगंबर प्रधान यांनी दिले आहेत.

be careful Violating speed limit while driving Action may be taken against you