माजी सैन्यअधिकाऱ्यास शिवसैनिकांची मारहाण ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया; संजय राऊत

समीर सुर्वे
Saturday, 12 September 2020

शिवसैनिकांकडून प्रतिक्रीया उत्स्फुर्त होती. मात्र, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

मुंबई : शिवसैनिकांकडून प्रतिक्रीया उत्स्फुर्त होती. मात्र, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीदेखील हिच भुमिका आहे. मात्र, अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वैराचार झाल्यावर संयमाचा बांध तुटतो, अशी प्रतिक्रीया नौदल अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 

सुशांत सिंग प्रकरणः मुंबई - गोव्यातून सहा ड्रग्ज वितरकांना अटक

माजी नौदल अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामिकारक असले तरी, त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त तितकीच उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. तरीही हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई झाली. विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे हे दुर्दैव आहे, असेही राऊत यांनी नमुद केले.

मुंबईत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; कोरोनामुक्तीच्या दरातही घट; 11 दिवसांत 2 टक्क्यांनी कमी

सयंम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदाबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर, लोकांच्या सयंमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनी जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागल्यास हि वेळ येणार नाही. ही राज्यकर्त्यांसोबतच विरोधकांचीही जबाबदारी आहे, असे त्यांनी नमुद केले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beating of ShivSainiks by a former army officer is a spontaneous reaction Sanjay Raut