esakal | सुशांत सिंग प्रकरणः मुंबई - गोव्यातून सहा ड्रग्ज वितरकांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंग प्रकरणः मुंबई - गोव्यातून सहा ड्रग्ज वितरकांना अटक

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्ज पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाने(एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली.

सुशांत सिंग प्रकरणः मुंबई - गोव्यातून सहा ड्रग्ज वितरकांना अटक

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पेजथ्री, बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवणा-या रॅकेटचा माग घेणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाने(एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोध मोहिम राबवली. याप्रकरणी कारवाईच्या भीतीने अनेक ड्रग्स वितरक अंडरग्राऊंड झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः ड्रग्स पुरवणाऱ्या रॅकेटचा मागोवा घेण्यासाठी  मुंबई - गोव्यात एनसीबीचे छापे

शोध मोहिमेत करनजीत सिग आनंद(23) याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढी दादर पश्चिम येथून डायवान अँथोनी फर्नांडीस याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. फर्नांडीस हा गांजा वितरक असून त्यांच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच पवरई येथील कारवआीत अंकुश अरेने(29) या वितरकालाही अटक करण्यात आली. त्याने करनजीत सिंग कडून गांजा घायचा. यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज केशवानी याला अंकुशने ड्रग्स दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून 42 ग्रॅम चरस व सव्वा लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गोवा येथील कारवाीत क्रिस कोस्टा याला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एनसीबी) पेज थ्री सेलिब्रीटींशी संबंधीत अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर  ड्रग्स पुरवणा-या रॅकेटशी संबंधीत इतरांच्या शोधात आहेत. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्स पुरवठा करणारे डझनभर वितरक आता अंडरग्राऊंड झाले आहेत. त्यासाठी एनसीबीने रविवारी विशेष शोध मोहिम राबवली. याप्रकरणी काही बॉलीवूड सेलेब्रीटींची यादी एनसीबीने तयार केली आहे. त्यांना ड्रग्स पुरवणा-या वितरकांचा शोध सध्या एनसीबीकडून सुरू आहे. त्यासाठी मुंबई व गोव्यात ही शोध मोहिम राबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; कोरोनामुक्तीच्या दरातही घट; 11 दिवसांत 2 टक्क्यांनी कमी

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात प्रकरणात तपास करणा-या एनसीबीने 18 जणांची यादी तयार केली आहे. या सर्वाना चौकशीचे समन्स पाठविण्यात येणार आहेत. त्यात काही सेलेब्रीटींसह पेज थ्रीमध्ये वावरणा-या व्यक्तीचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )