आयोध्या दौऱ्यापूर्वी केंद्र सरकार वाढवणार राज ठाकरेंची सुरक्षा

भोंग्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे.
राज ठाकरे
राज ठाकरेसकाळ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात त्यांच्या आयोध्या दौऱ्याची (Raj Thackeray Ayodhya Tour) तारीख जाहीर केली असून, 5 मे रोजी राज ठाकरे आयोध्येला जाणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भोंग्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांना केंद्र सरकार विशेष सुरक्षा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राज ठाकरे यांना Y प्लस सुरक्षा आहे. (Center Government Planning To Increase Raj Thackeray Security )

राज ठाकरे
Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची वाय प्लस सुरक्षा असून, त्यात आता केंद्र सरकारदेखील राज ठाकरे यांना अधिकची सुरक्षा पुरवण्याच्या विचार करत आहे. याशिवाय राज ठाकरे हे पाच जून रोजी अयोध्या दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारदेखील राज ठाकरे यांना त्यांच्या आयोध्या दौऱ्यादरम्यान अधिक सुरक्षा देणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. (Raj Thackeray Security)

राज ठाकरे
भोंगा प्रकरण: मुंबई पोलिसांची 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय; 3000 पोस्ट डिलीट

पुण्यातल्या पत्रकार परिषदेत पुन्हा दिला इशारा

नुकतीच राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदीरात महाआरती आणि सामुहिक हनुमान चालिसाचे पठन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘‘भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मला राज्यातील शांतता बिघडावयाची नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, सांगून देखील तुम्ही ऐकणार नसला आणि दिवसभरात पाच वेळा भोंगा लावणार असाल, तर मशिदीसमोर आम्ही देखील पाच वेळा हनुमान चालिसा लावू,’’ अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे
IPL संकटात: दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात कोरोनाचा शिरकाव; पुढील प्रवासावर बंदी

‘‘गेल्या अनेक वर्ष हा विषय तसाच राहिला आहे. कोणी काही लिहिले नाही, म्हणून मला वाटले त्यावर बोलले पाहिजे. याचा त्रास फक्त हिंदूंनाच होतो आहे, असे नाही. तर मुस्लिम समाजाला देखील होत आहे. देशभरातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमझान सुरु आहे. मला काही करावयाचे नाही. परंतु, तीन तारखेपर्यंत त्यांना समजले नाही आणि सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा त्यांना धर्म मोठा वाटत असले, तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. मनसेच्यावतीने त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com